मुंबई_ दि.६ - सालाबादप्रमाणे यंदाही भगवान गौतम बुद्धांची २५६७ वी जयंती देशभरातच नव्हे तर, सा-या…
मिरा भाईंदर महानगरपालिका आयोजित “माझी वसुंधरा” अभियान अंतर्गत “वनमहोत्सव 2023” चा शुभारंभ
मिरा भाईंदर महानगरपालिका आयोजित "माझी वसुंधरा" अभियान अंतर्गत "वनमहोत्सव 2023" चा मा. आमदार Pratap Sarnaik , आयुक्त तथा प्रशासक श्री. दिलीप ढोले यांच्या हस्ते शुभारंभ
मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. दिलीप ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासन माझी वसुंधरा अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या पार्श्वभुमीवर “माझी वसुंधरा” अभियान अंतर्गत दिनांक 25 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी “वनमहोत्सव 2023” चा शुभारंभ मा. आमदार श्री. प्रताप सरनाईक, आयुक्त तथा प्रशासक श्री. दिलीप ढोले यांच्या शुभहस्ते करण्यात आला. प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (उद्यान) संजय शिंदे, उपायुक्त (घ.क.व्य.) रवी पवार, उपायुक्त (शिक्षण) कल्पिता पिंपळे, शहर अभियंता दिपक खांबित, महानगरपालिका विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पंचतत्वावर आधारित असलेल्या मूल्यांच्या माहितीची जनजागृती करणेकामी महानगरपालिकामार्फत वनमहोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. या वनमहोत्सवात पर्यावरण व संस्कृती संवर्धनासाठी विविध प्रकारचे भव्य विक्री प्रदर्शन आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनामध्ये औषधी वनस्पती, बी-बियाणे रोपे, नर्सरी, आयुर्वेदिक व सौंदर्य उत्पादने, हस्तकला व हॅण्डलुम उत्पादने, विविध प्रकारचे अलंकार, खाद्यसंस्कृती, पर्यावरण संवर्धन प्रकल्प जसे की सोलार सेल्स, सोलार बॅटरी, EV चार्जिंग पॉइंट्स, रेन वॉटर हार्वेस्टिंग इत्यादी श्रेणीतील प्रदर्शन भरवण्यात आले आहेत. मा. आमदार व मा. आयुक्त यांनी सदर पर्यावरणपूरक स्टॉल्सची पाहणी केली. तसेच सदर शुभारंभ दरम्यान विविध सांस्कृतिक व कलात्मक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले.
मा. आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी मनोगत व्यक्त करताना मिरा भाईंदर शहरातील उद्यानांच्या देखभाल, निगा व दुरुस्तीबाबत विशेष कौतुक केले. शहरातील नागरिकांनी पर्यावरण आणि निसर्ग याविषयी संवेदनशील बनणे, नैसर्गिक साधन संपत्तींचे संवर्धन करण्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिका आयोजित माझी वसुंधरा अभियान अंतर्गत दिनांक 25 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी 2023 रोजी “वनमहोत्सव 2023” मध्ये शहरातील जबाबदार नागरिक म्हणून जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शन स्टॉल्स मध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन आयुक्त तथा प्रशासक श्री. दिलीप ढोले यांच्या वतीने करण्यात येत आहे.
This Post Has 0 Comments