skip to Main Content

‘घर-घर भीम कंदिल’ अभियानाला चांगला प्रतिसाद

Mumbai: ‘घर-घर भीम कंदिल’ अभियानाला चांगला प्रतिसाद

मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला सारा विश्व सलाम करत आहे. याच कृतघ्न भावनेतून १४ एप्रिल या महामानवाच्या जन्मदिनी सारा विश्व डॉ.बाबासाहेबांची जयंती दरवर्षी धुमधडाक्यात साजरी करीत आहे.

विविध पक्ष,संघटना,मंडळ आपआपल्या परिने आपल्या महामानवाला मानवंदना म्हणून मोठ्या थाटामाटात ‘जयंती महोत्सव’ आनंदाने साजरा करतात. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त आपल्या आनंदात भर घालण्यासाठी पुन्हा एकदा नव्या रुपाने नव्या रंगाने सम्यक सेवा संघाच्या माध्यमातून आकर्षक असे भीम कंदील तयार करण्यात आले आहे.

‘सम्यक सेवा संघ’ च्या माध्यमातून आठ वर्षापुर्वी सुरु करण्यात आलेल्या ‘घर-घर भीम कंदील’ या अभियानाला नेहमीप्रमाणे या वर्षी देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे.

बाबासाहेबांना मानवंदना’त्यांच्या प्रती कृतघ्न भावनेतून जन्मास आलेल्या ‘घर-घर भीम कंदील’ आज महाराष्ट्राच्या घरो-घरी पोहोचले आहे तसेच परराज्याने देखील या अभियानाची दखल घेतली असून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

तरी आपल्या महामानवाच्या जयंती उत्सवाला अजून मोठे भव्य-दिव्य असे स्वरूप देण्यासाठी “१४ एप्रिल ते ५ मे,बुद्ध पोर्णिमा” पर्यंत प्रत्येकाने घरी भीम कंदील लावून भीम जयंती व बुद्ध पोर्णिमा साजरी करावी असे आव्हान ‘सम्यक सेवा संघ’द्वारे करण्यात आले.

This Post Has 0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top