Mumbai: 'घर-घर भीम कंदिल' अभियानाला चांगला प्रतिसाद मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याला सारा विश्व…
संयुक्तिक जयंतीनिमित्त ‘सम्यक सेवा संघाच्या’ वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन…
मुंबई_ दि.६ – सालाबादप्रमाणे यंदाही भगवान गौतम बुद्धांची २५६७ वी जयंती देशभरातच नव्हे तर, सा-या विश्वात आनंदात साजरी होत आहे. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वे जयंती महोत्सव वर्ष असून बाबासाहेबांच्या धर्मपत्नी ‘माता रमाई’ यांची १२५ वी जयंती महोत्सव वर्ष असल्यामुळे देशभरात सारा समाज आपआपल्या परीने आपल्या या महापुरुषांना व महामातांना मानवंदना देण्याच्या हेतुने विविध प्रकारचे कार्यक्रम, समारंभ आयोजित करून जयंती महोत्सव मोठ्या आनंदाने साजरा करीत आहे.
शिवडीतील ‘सम्यक सेवा संघाच्या’ वतीने संयुक्तिक जयंती महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. दरम्यान बुद्ध वंदना घेतल्यानंतर बौद्धचारी आयु. संतोष जाधव यांच्या देखरेखे खाली अतिशय शिस्तबद्ध वातावरणात बौद्ध धम्म दिक्षाचा कार्यक्रम पार पडला. विविध प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले व मान्यवरांचे आंबेडकरी चळवळीवर मार्गदर्शक असे प्रवचन ही झाले. प्रबोधनासोबत महिलांच्या मनोरंजना करीता ‘खेळ खेळुया पैठणीचा ‘ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धात्मक मनोरंजनाची जोड असल्यामुळे मोठ्या संख्येने महिला वर्गाने कार्यक्रमाला हजेरी लावून भाग घेतला. तसेच शनिवार दि.६, रोजी लहान मोठ्यांसाठी विविध प्रकारच्या स्मरणशक्ती स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत. विशेष आकर्षण म्हणून लहान मुलांनी संगीतबद्ध, स्वरबद्ध केलेला हिंदी-मराठी गीतांचा ऑर्केस्ट्रा द रायझिंग यंग स्टार याचे आयोजन करण्यात आले आहे. शेवटी बक्षिस समारंभ घेऊन जयंती महोत्सवाची सांगता होणार आहे. या वेळी कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता परिश्रम घेतलेल्या प्रत्येकाचे ‘ सम्यक सेवा संघ’






This Post Has 0 Comments