मुंबई_ दि.६ - सालाबादप्रमाणे यंदाही भगवान गौतम बुद्धांची २५६७ वी जयंती देशभरातच नव्हे तर, सा-या…
शिवडी मुंबई येथे सम्यक सेवा संघाच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५६५वी व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला..
मुंबई ( प्रतिनिधी ) : गेल्या वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व सण व महापुरुषांच्या जयंती लोकांनी घरातूनच साजरी करण्यात आल्या होत्या. त्याच अनुषंगाने शिवडी परिवार साफल्य येथे सम्यक सेवा संघ या मंडळाच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५६५ वी व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी संयुक्त जयंती महोत्सव सरकाराच्या सर्व नियम प्रणाली नुसार ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला. या मंडळाच्या तर्फे यावर्षी सामाजिक उत्तरदायित्वाच्या जानिवतचे भान ठेऊन, जे कोरोना योद्धां आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कार्य कर्तव्यनिष्ठ बजावीत असलेल्या कोरोना- योध्दांचा मास्क, सॅनिटायझर, मिठाई, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानचे सुशोभिकरण व विविध प्राण्यांचे, पक्षाचे चित्र काढून उद्यानाची रंग- रंगोटीचे कार्य देखील करण्यात आले.गणेश साळुंखे (चित्रकार) यांनी सर्व चित्र काढली,त्याच बरोबर मंडळाच्या वतीने ऑनलाईन पध्दतीने एकेरी नृत्य स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कराओके गीत गायन स्पर्धा, “कोण होणार बुध्दीमान” (प्रश्नांवली स्पर्धा) व महिलांसाठी एक आगळीवेगळी केशभूषा स्पर्धा अशा अनेक स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते.१९७९ या वर्षापासून सदर मंडळ सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक तसेच विविध कार्यक्रम व समाज उपयोगी उपक्रम आयोजित करित आले आहे. या प्रसंगी संदीप गांगुर्डे, अतुल तिवडे, कुंदन तिवडे, प्रदीप जाधव, गिरीश जाधव, धनंजय तारकर, सचिन गायकवाड, सुधीर चंदनशिवे संजय भालेराव, अभय भालेराव प्रशांत गांगुर्डे व मंडळाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी हा जयंती महोत्सव शांततेत पार पडण्यासाठी अतिशय मेहनत घेतली…
This Post Has 0 Comments